मुख्यालयी उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचा गौरव
अलिबाग ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनी मंगळवारी (दि. 15) ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते झाले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती म्हसे, सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन भरत वाघमारे, स्नेहा उबाळे, विठ्ठल इनामदार, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, सचिन शेजाळ, तहसीलदार ज्ञानदेव यादव यांसह विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या पोलिस तसेच शासकिय अधिकारी-कर्मचार्यांचा, सामाजिक संस्थांचा व व्यक्तींचा या वेळी गौरव करण्यात आला. राखीव पोलीस निरीक्षक विजय रंगनाथ बाविस्कर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक मिळाल्याबद्दल, 71वी आखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पधेत प्राप्त सुवर्ण पदक विजेते पोलिस शिपाई कुशल सोमलींग बनसोडे , पोलीस शिपाई प्रियांका अर्चित भोगांवकर आणि कारागृह विभाग 2022-23 या वर्षाकरिता प्रशसनीय सेवेबद्दल अशोक दगडू चव्हाण व मधुकर विष्णु कांबळे, शालेय स्तरावरील विविध परीक्षमधील यशासाठी मयंक अमोल भोसले (इ. 6 वी), नैसर्गिक आपत्तीमधील सहकार्य व मदतीसाठी अपघातांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ रामचंद्र साठलेकर व विजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कस्तूरी नरेंद्र भालवलकर, आरवी नरेंद्र भालवलकर, आरोही मोनिष कटोर, मोनिष्का मोनिष कटोर यांना माझी कन्या भाग्यश्री पात्र लाभार्थी मुदत ठेव वाटप करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राथमिक शिक्षक संदीप वारगे आदींचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
भाजप मंडळ नागोठणेच्या वतीने स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक उपक्रमांनी अतिशय उत्साही वातावरण साजरा करण्यात आला. या वेळी रोहा तालुका मंडळ अध्यक्ष सोपान जांबेकर, भाजप नेते किशोर्र म्हात्रे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, उपाध्यक्ष मारुती देवरे, श्रेया कुंटे, सिराज पानसरे, सुभाष पाटील, संतोष लाड, एकनाथ ठाकूर, शंकर ठाकुर, विवेक रावकर, शामकांत नेरपगार, संजय लोटणकर, प्रमोद गोळे, शेखर गोळे, ज्ञानेश्वर शिर्के, अनिल पवार, अंकुश सुटे, मोरेश्वर म्हात्रे, राउफ कडवेकर, धनराज उमाळे, तिरत पोलसानी, अॅड. गणेश जाधव, जावेद दापोलकर, महिला मोर्चा ता. उपाध्यक्षा माधुरी रावकर, सोनल पडवळ, सविता वाढवकर, सोनी पांडे, प्रियांका रावकर आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान भाजपचे नागोठणे जिल्हा परिषद गण अध्यक्ष शेखर गोळे यांचा सुपुत्र जय याने स्वातंत्र्य दिनाविषयी केलेल्या भाषणाचे कौतुक करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ते सिराज पानसरे यांनी जय यांस बक्षीस दिले. कोलाड वरसगाव इथल्या एमडीएन फ्युचर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरात रिसपेक्ट द फ्लॅग या थीमखाली प्रभातफेरी काढली व तिरंगा सन्मान पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये तिरंग्याचा सन्मान करावा, त्याच्या रक्षणासाठी अनेकांनी केलेले बलिदान याची आठवण करून दिली.
पेण प्रांत कार्यालयात व तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.ठिकठिकाणी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात आमदार रविशेठ पाटील, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार नितीन परदेशी, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, वैकुंठ पाटील, अॅड. मंगेश नेने, अनिरुद्ध पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वन अधिकारी कुलदीप पाटकर, एसटी जिल्हा विभाग नियंत्रक दीपक घोडे, बापूसाहेब नेने, माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, अरविंद वनगे, दीपश्री पोटफोडे, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. खोपोली व खालापुरातील ठिकठिकाणी भारतीय स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त खोपोली नगरपालिका व तहसील कार्यालयाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.