रुग्णांचे हाल; व्हिडीओ व्हायरल
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई वाशी स्टेशनलगत एग्झिबिशन हॉलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड सेंटर बनवले आहे. मात्र उडघटनानंतर एका आठवड्याच्या आता या सेंटरमध्ये रुग्णांना समस्या जाणवत असल्याचे उघड झाले आहे. तसे व्हिडीओ देखील व्हायरल झल्याने पालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.
11 जून रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पाहनिदौर्यात हे कोविड सेंटर रुग्णांसाठी खुले करण्यात आले होते. त्यावेळी आकर्षक कोवड सेंटरचे सर्वच स्थरांतून कौतुक केले जात होते. मात्र अवघ्या पाच दिवसांत या कोविड सेंटरच्या समस्या समोर येऊ लागल्या आहेत. त्या समस्यांचे व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. यातील महत्वाची समस्या म्हणजे रुग्णांसाठी लावलेले टेबल फॅन अपुरे पडत असल्याने रुग्णांना घामाच्या धारेत दिवस घालवावे लागत आहे. तर आद्यय्यावत व चकाचक बांधलेले बाथरूम तुंबल्याने पाणी साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. त्यात बाथरूममध्ये गुळगुळीत फारशी असल्याने पाणी साठून निसरड्या झालेल्या बाथरूममध्ये घसरून पडण्याची वेगळीच भीती कोरोना रुग्णांना जाणवू लागली आहे. या साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून रुग्णांना नैसर्गिक विधीसाठी ये-जा
करावी लागते.
कोरोनासोबत साथीचे आजार देखील वाढण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे पावसाळा जवळ आल्याने वाशीतील रुग्णालयातून कोरोना सेंटर संपूर्णपणे हलवावे लागणार आहे. मात्र सिडको सेंटरमध्ये जर समस्या निर्माण होणार असतील तर रुग्ण देखील या सेंटरमध्ये येण्यास नकार देण्याची शक्यता आहे. यामुळे करोडो रुपये खर्च केलेल्या समस्या काही दिवसांत उघड झाल्याने निष्क्रिय काम समोर आल्याचें बोलले जात असून पालिका कोणती पाऊले उचलते हे तातडीने पाहावे लागणार आहे. या संदर्भात प्रस्तूत प्रतिनिधींनी पालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.