उरण : वार्ताहर – दरवर्षी पावसाळ्याला सुरुवातीला नागरिक आपल्या आवडीची फुलझाडे, फळ झाडे लावत असतात. आपल्या घराशेजारी बाल्कनीत, आवारात आदी ठिकाणी आपल्या जागेत फुलझाडे, कलम केलेली फळ झाडे, फुलझाडे लावतात परंतु कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये त्या करिता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिक झाडे, फुलझाडे खरेदी करण्यास घरातून फुलांच्या नर्सरीत जात नाहीत. त्यामुळे रोपे, कलम केलेली फळझाडे, फुलझाडे यांची विक्री बंद झालेली आहे.
झाडांच्या नर्सरीत असलेली झाडे त्यांची जोपासना, त्यांना वाढण्यासाठी लागणारी खते, पाणी, जागेचे भाडे व हे सर्व करून मोठी झालेली झाडांची विक्री बंद झाल्याने नर्सरीवर उदरनिर्वाह करणे होणारा खर्च वाढला आहे. त्यामुळे नर्सरी धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे. धंदेवाइक यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. नर्सरीमध्ये विविध कलम केलेली झाडे असून त्यात आंबा, नारळ, फणस, डाळिंब, चिकू, जाम अशी फळझाडे कलम, तर फुल झाडांमध्ये गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई-जुई, टगर आदी चा समावेश असतो.
दरवर्षी पावसाला सुरु झाला की, नागरिक आपल्या आवडीचे फुले, झाडे, विविध कलम केलेली फळझाडे खरेदी करीत असत. परंतु यंदा कोरोनामुळे नागरिकांनी फुलझाडे, नर्सरीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आमचा धंद्यात उतरती कला लागली आहे. झाडे, जोपासा, त्यांना वाढीसाठी खत टाका साफ सफाई ठेवा. ज्या जमिनीवर नर्सरी आहे त्याचे भाडे द्या. एकूण खर्च वाढला असून उपासमारीची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया पेट्रोल पंप जवळील असलेल्या गणेश रोज नर्सरीचे गणेश शाह यांनी
व्यक्त केली.