Breaking News

पनवेल महापालिकेच्या विविध समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला; सत्ताधारी सर्व उमेदवारांची सभापतिपदांवर निवड; पनवेल महापालिकेच्या विविध समित्यांची निवडणूक बुधवारी

पनवेल : प्रतिनिधी

(दि. 28) ऑनलाइन पद्धतीने होऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा फडकला आहे. स्थायी समिती सभापतिपदी संतोष शेट्टी आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे चारही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदी सत्ताधारी उमेदवार विजयी झाले आहेत. पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती तसेच अ, ब, क, ड अशा चारही विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. कोरोनामुळे चारही सभापतींना मुदतवाढ मिळाल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप-रिपाइंतर्फे स्थायी समिती सभापतिपदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती ‘अ’साठी अनिता पाटील, प्रभाग ‘ब’साठी नगरसेवक समीर ठाकूर, प्रभाग ‘क’साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग ‘ड’साठी नगरसेविका सुशीला घरत यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सोमवारी सादर केले होते. विरोधकांकडून शेकापतर्फे प्रभाग ‘अ’साठी  विष्णू जोशी व प्रभाग ‘ब’साठी गोपाळ भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत स्थायी समिती सभापतिपदी नगरसेवक संतोष शेट्टी आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी नगरसेविका मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली. याचबरोबर प्रभाग समिती ‘क’ सभापतिपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग ‘ड’ सभापतिपदी सुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली, तर प्रभाग ‘अ’मध्ये भाजपच्या अनिता पाटील यांनी शेकापचे उमेदवार विष्णू जोशी यांचा 13 विरुद्ध 10 असा आणि प्रभाग ‘ब’मध्ये भाजपच्याच समीर ठाकूर यांनी शेकापचे गोपाळ भगत यांचा 14 विरुद्ध 9 असा प्रभाव केला. नवनिर्वाचित सभापतींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भाजप-रिपाइंचे वर्चस्व कायम

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप-रिपाइंची एकहाती सत्ता असल्याने या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता. फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार बुधवारी निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि प्रभाग समित्यांच्या सभापतिपदी भाजप-रिपाइंचे वर्चस्व स्पष्ट झाले.

समिती व नवे सभापती

स्थायी : संतोष शेट्टी

महिला व बालकल्याण : मोनिका महानवर

प्रभाग अ : अनिता पाटील

प्रभाग ब : समीर ठाकूर

प्रभाग क : हेमलता म्हात्रे

प्रभाग ड : सुशीला घरत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाच्या मार्गावरून चालताना त्यांनी केलेला विकास लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका कोरोनामुक्त करणार.

-संतोष शेट्टी, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती, पनवेल महापालिका

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply