Breaking News

जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – ’जुनं ते सोनं’ या संकल्पनेतून संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन झाले. संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या प्रसिद्धी व गायन विधाप्रमुख नृपाली जोशी यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन झाले.

पनवेल, मुंबई, कोकण परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या घरामध्ये असलेल्या साधारण 100 वर्षांपूर्वीच्या वस्तूंबाबत माहिती देण्याचे आवाहन संस्थेने केले. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांच्या संग्रहातील देवपूजेची उपकरणी, अलंकार, शृंगारपेटी, नाणी, सोन्याच्या तारेपासून विणलेल्या

काठाच्या पैठण्या, दगडी व धातूच्या नित्योपयोगी वस्तू अशा अनेक प्रकारच्या छायाचित्रांचे संकलन करण्यात आले.  नवीन पनवेल येथील पद्मनाभ व मुग्धा भागवत या दांपत्याने त्यांचे योग्य चित्रिकरण केले. नंतर ते सर्व संकलित करून उत्तम तंत्र व संगीत यांच्या सहाय्याने हे प्रदर्शन युट्युब व फेसबुक या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. 

या उपक्रमाला संस्थेच्या नवीन पनवेल अध्यक्ष उमा जोशी, सचीव वर्षा मेहेंदर्गे, सदस्या निलिमा देशपांडे, अनुराधा ओगले यांनी मोलाचे योगदान दिले. हे प्रदर्शन हीींिीं://ुुुर्र्.ूेीीींलश.लेा/ुरींलहर्?ीं=078घवुॠ80शु या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जुन्या वस्तू हा आपला अनमोल ठेवा आहे. या वस्तू नवीन पिढीला ज्ञात नाहीत. या वस्तू व त्यांची उपयुक्तता यांची माहिती त्यांना व्हावी या उद्देशाने संस्कार भारतीने हा उपक्रम आयोजित

केला. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन स्वरूपात उपक्रम पार पडला व त्याला संग्रहकर्त्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला.

– नृपाली जोशी, संस्कारभारती, नवीन पनवेल

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply