पनवेल : रामप्रहर वृत्त
केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी गुरुवार (दि.19)पासून सहकार्यांसह प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
पनवेलच्या राजकारणात आपली भक्कम पकड निर्माण करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वी पनवेल महापालिका, रायगड जिल्हा परिषद तसेच पनवेल पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी करत विरोधकांना अक्षरशः चारीमुंड्या चीत केले. या सलग विजयांमुळे त्यांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत संघटन कौशल्याची प्रभावी छाप पाडली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या यशस्वी कामगिरीची दखल घेत भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रदेश चिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. त्यानंतर आता केरळसारख्या आव्हानात्मक राज्यात कासरगोड मतदारसंघाची धुरा देत पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सबका साथ, सबका विकास या धोरणावर विश्वास ठेवून जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीच्या जोरावर कासरगोडमध्ये निश्चितच विजय मिळवू.
Check Also
‘लोकनेता : एक युगपुरुष’… रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उलगडला जीवनप्रवास
खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper