पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांची निवड झाली आहे. याबद्दल भाजप पदाधिकार्यांनी आणि नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडीवेळी महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपमहापौर प्रमिला पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, गणेश कडू, दशरथ म्हात्रे, सुमित झुंझारराव, अजय बहिरा, नगरसेविका डॉ. अस्मिता घरत, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रविनाथ पाटील, अमोल जाधव, कामगार नेते रवी नाईक, यतीन पाटील उपस्थित होते. सर्वांनी अॅड. बिनेदार यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
सभागृहातील अनुभवी, नियमांचा अभ्यास करणारे आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून अॅड. प्रकाश बिनेदार यांची ओळख आहे. त्यांच्या सहकार्याने सभागृहात विकासाच्या मुद्द्यांना अधिक गती मिळेल, असा विश्वास महापौर नितीन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, नवनिर्वाचित सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपच्या नेतृत्वाचे निवडीबद्दल आभार मानले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper