Breaking News

यंदा गणेशोत्सवही साधेपणाने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून, मंडळांनी सरकार देईल तो आदेश मान्य करणार असल्याचे सांगितले आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव असून, अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे, मात्र सध्या कोरोना विषाणूचे संकट अधिक गडद बनू लागल्याने या वर्षीचा गणेशोत्सव नेमका कसा साजरा होईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. कोरोनाचे संकट असल्याने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे या वेळी ठरले.
मिरवणुकांना बंदी
कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. आपण प्रत्येक पाऊल हे सावधपणे टाकत आहोत. गणेशोत्सवही याच चौकटीत राहून साजरा करावा लागेल. परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेतानाच सामाजिक भानही ठेवावे लागेल, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply