Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते सुधागडात नुकसानग्रस्तांना धनादेश वाटप

सुधागड : रामप्रहर वृत्त – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सुधागड तालुक्यातील परळी, नवघर, तिवरे चिखलगाव या चार ग्रामपंचायतींमधील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास सदस्य रवींद्र देशमुख, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड-पालीचे तहसीलदार दिलीप रायण्णावार, सुधागड पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपसभापती उज्ज्वला देसाई, सरपंच संदेश कुंभार, सुधागड भाजप अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, पेण अध्यक्ष श्रीकांत पाटील, सागर मोरे, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला तसेच जास्तीत जास्त भरपाई नुकसानग्रस्तांच्या पदरी पडावी, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जात आहेत, असे या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply