कळंबोली : प्रतिनिधी – कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाताला काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेलमधील अशा कष्टकरी, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबियांना नवी मुंबईतील पोस्ट संघटनानी अन्नधान्याचे वाटप केले.नॅशनल युनियन ऑफ पोस्ट कामगार संघटनेच्या सीडी व जीडीएस नवी मुंबई विभागातील सर्व विभाग संघटनेच्या वतीने पनवेलमधील 200 झोपडपट्टीतील गरीब गरजूंना 50 हजार रुपयांच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper