नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र या वेळची परिस्थिती तशी नाही. त्यामुळे कोरोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही, पण प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये योगासने करणे तरुण वर्गात लोकप्रिय होत चालली आहेत याचा विशेष आनंद होतो आहे. आपण या वर्षी सहावा योग दिवस साजरा करतो आहोत. हा जनतेने सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा दिवस असतो, मात्र यंदा आपल्याला हा योग दिवस सार्वजनिकरित्या साजरा करता येणार नाही. या वर्षीची थीम घरीच राहून कुटुंबीयांसोबत योग करा अशी आहे.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …