Breaking News

चिनी वस्तूंची विक्री न करण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेलसह रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीस आपल्या दुकानात ठेवू नयेत असे आवाहन केले आहे.

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय मनोजसंसारे यांनी चिनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच चिनच्या मालाला बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेलसह रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीस आपल्या दुकानात ठेवू नयेत असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनीसुद्धा मेड इन इंडिया या वस्तूंचीच खरेदी करा, चिनचे आर्थिक कंबरडे मोडायचे असेल तर चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगून आपल्या मोबाइलमध्ये असलेले चायनिज अपही डिलीट करण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply