Breaking News

युवानाद संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेणार्‍या युवानाद संस्थेच्या वतीने सध्या कोविड-19 या विषाणूमुळे सर्वत्र थैमान सुरू असल्याने रूग्णांना रक्ताची गरज भासत आहे. यासाठी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला तरूणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

रूग्णांना उपचारादरम्यान रक्ताची कमतरता भासू नये यासाठी युवानाद पथकातर्फे महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, रक्तपेढीच्या माध्यमातून विरूपाक्ष मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या वेळी पथकातील सभासदांबरोबरच स्थानिक नागरिकांनीसुद्धा उत्स्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या रक्तदानात सहभागी होणार्‍या प्रत्येक रक्तदात्याला सामाजिक संदेश म्हणून हॅण्डवॉश देण्यात आल्याची माहिती प्रथमेश सोमण यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply