Friday , September 22 2023

सुसज्ज कार्यालयामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळू शकेल

– सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास
– विभागीय, उपविभागीय कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल विभागीय आणि उपविभागीय कार्यालय पनवेल क्रमांक 1 व 2 या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (दि. 28) पनवेल भिंगारी येथे झाले. या वेळी मंत्रीमहोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकार्‍यांशी आणि कर्मचार्‍यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण मुख्य अभियंता शरद राजभोज, रायगड अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अधीक्षक अभियंता रूपाली पाटील, कार्यकारी अभियंता अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच सबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाची विभागीय कार्यालये ही चांगली व सुसज्ज असली पाहिजेत. यामुळे कार्यालयीन अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांचा कार्यक्षमतेमध्ये नक्कीच वाढ होईल तसेच येथे राहणार्‍या स्थानिक नागरिकांना या सुसज्ज व चांगल्या कार्यालयाचा नक्कीच फायदा होईल व सुलभ शासकीय सेवा मिळू शकेल, असे मंत्री रवींद्र चव्हाण या वेळी म्हणाले. सार्वजनिक विभागाची सर्वच विभागीय कार्यालये अशाच पद्धतीने सुसज्ज व उत्तम आणि दर्जेदार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply