Breaking News

विद्यार्थिनीची आत्महत्या

पनवेल ः शहरातील राहत्या इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रेया म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

दहावीची परीक्षा दिलेल्या श्रेयाने बाहेर जाऊन येते, असे आईला सांगितले. त्यानंतर तिने सनराईज बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे अधिक तपास करीत आहेत.

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

पनवेल ः गाढी नदीत बुडाल्याने एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विवेक जाधव हा मद्यपान करून नदीकिनारी गेला होता. या वेळी मद्याच्या नशेत त्याने सुकापूर येथील गाढी नदीपात्रात उडी मारली. सोबत असणार्‍या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. या वेळी विवेकचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश करचे करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply