Breaking News

देशात कोरोनाचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारी (दि. 25) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 16 हजार 922 नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे, तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख 73 हजार 105 इतकी झाली आहे.
देशात कोरोनाचे एक लाख 86 हजार 514 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत दोन लाख 71 हजार 697 लोक बरे झाले आहेत, तर 14 हजार 894 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाचे 3890 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या एक लाख 42 हजार 900 झाली आहे, तर एकूण मृतांची संख्या 6739वर पोहोचली आहे. कोरोनाच्या संख्येत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 390वर गेली आहे, तर एकूण 2365 जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply