Breaking News

कळंबुसरे येथे नऊ फुटी अजगरास जीवदान

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील एका घराच्या पडवीत रात्री भक्ष्य पकडण्याच्या शोधात आलेल्या आजगराला काशिनाथ खारपाटील, रमेश फोफेरकर, जगन्नाथ पाटील या निसर्ग संरक्षण सर्प मित्र संस्थेच्या सर्पमित्रांनी सदर ठिकाणी धाव घेवून या 9 फुटी अजगराच्या अलगद पकडले. यानंतर या विभागातील वनपाल यांच्या समक्ष इंद्रायणी डोंगरातील जंगलात मुक्त संचार करण्यासाठी या आजगराला सुखरूप सोडून जीवदान देण्याचे काम केले आहे. शुक्रवारी रात्री एक अजगर कोंबड्याच्या खुराड्यामध्ये जात असतांना सचिन पाटील यांनी पाहिला. मात्र सर्पमित्रांनी केलेल्या समाजप्रबोधनामुळे त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सर्प मित्र महेश भोईर यांना संपर्क साधला. काही वेळेतच सर्प मित्र येऊन त्या आजगराला पकडण्यात आले. आणि वनपाल यांच्या समक्ष जंगलात सोडून दिले. या वेळी वनपाल  राऊत राय, वनक्षेत्ररक्षक सन्नी ढोले, संतोष इंगोले, मेजर बोरसे सर्प मित्र, आनंद मढवी, महेश भोईर, संतोष पाटील, आकाश घरत, विनीत मढवी, शुभम मढवी, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply