Breaking News

आजपासून पुन्हा ऑनलाइन शाळा

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना साथीचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन सुरू राहणार आहे. काही शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरूही झाले असून, मंगळवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील सर्व शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात शाळेतील घंटा वाजली नसली तरी ऑनलाइन घंटा होत आहे.
मार्च 2020पासून कोरोना महामारी सुरू झाली. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामध्ये सर्व व्यवहारांसह शाळा, कॉलेजही बंद करण्यात आले. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाइन सुरू झाले. परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मध्यंतरी इयत्ता पाचवी ते बारावी आणि महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्यात आले होते, मात्र पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढला आणि ऑनलाइन शिक्षण पुढेही चालू राहिले.
नवे 2021-22 शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले आहे, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाही शिक्षण ऑनलाइनच सुरू झाले आहे. शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी घरूनच अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. गुगल मीट, झूम अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाइन धडे घेत आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply