Breaking News

देशातील कोरोना रुग्ण पाच लाखांवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी (दि. 27) संपलेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख आठ हजार 953 इतकी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 18 हजार 552 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली, तर 384 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या 15 हजार 685 इतकी झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून 14 ते 15 हजारांनी वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 18 हजारांचा टप्पा ओलांडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिकव्हरी रेटही वाढला
समाधानकारक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. एक लाख 97 हजार 387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दोन लाख
95 हजार 881 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून 57.43 टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा तीन टक्के आहे, जो अत्यल्प आहे तसेच रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहोचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण तीन दिवसांवर होते, अशीही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply