
उरण : वार्ताहर
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे शाळा बंद असून मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. यात विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये या करिता हे ऑनलाइन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत जेणे करून मुले घरी बसून आपला सर्व सिलॅबस पूर्ण करू शकतील. आणि त्यांचा अमूल्य वेळ सत्कारणी लागेल तसेच ह्या क्लासेसमुळे विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही आणि करोना रोखण्यास नक्कीच मदत होईल. प्रथमच स्कूल सेक्शन साठी ऑनलाइन आणि लाईव्ह क्लास जुलै 2020 पासून सकाळी 9 पासून सुरू केले आहेत. ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली लाखो रुपये फी घेतली जाते आणि सामान्य माणूस ती फी भरू शकत नाही म्हणून प्रा. राजेंद्र मढवी यांनी पूर्ण सेट-अप स्वखर्चाने तयार केला आहे.
हे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ते स्वतः मोफत घेणार आहेत. पाचवीसाठी सकाळी 9 ते 11 व आठवीसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत ऑनलाइन शिकता येईल. यासाठी विद्यार्थ्याला फक्त आपले नाव आणि मोबाइल नंबर सरांच्या मोबाइलवर पाठवायचा आहे. जेणे करून ते तुम्हाला ते 5 जुलैपासून दर रविवारी सुरू होणार्या बॅचमध्ये अॅड करून घेतील. नंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून वैश्णवी अॅकॅडमी लाईव्ह सेशन (vaishnavi academy live session) हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा. पाचवी च्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट लॉगीनमधून 5ssb1806 हा बॅच कोड टाकून व 8 वी च्या विद्यार्थ्यांनी 8ssb1806 हा बॅच कोड टाकून आपली नोंदणी करू शकता. आणि निश्चिंत पणे लाईव्ह लेक्चर्स पाहू शकता. प्रा. राजेंद्र मढवी (M. Tech, MBA) हे शिक्षण क्षेत्रात गेली 20 वर्षे निरंतर अध्ययन करत असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वैष्णवी अॅकॅडमी या संस्थेने सर्व इंजिनीअरिंग कोचिंग क्लासेसला मागे टाकत इंजीनीयरींग च्या शिक्षण पद्धतीतला स्वतचा एक ट्रेन्ड प्रस्थापित केलेला आहे. याबद्दल त्या संस्थेला टाईम्स ऑफ इंडिया न्यु ट्रेन्ड सेंटर एन्टरप्रेन्यूअर अॅवॉर्डने सन्मानीत केले आहे. आपला सामाजिक पिंड जपत त्यांनी सर्व ग्रामीण, शहरी (मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश मिडीयम) मुलांना मोफत कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत.
इयत्ता पाचवी व आठवीला असणार्या व प्रामाणीक पणे अभ्यास करणार्या मुलांसाठी ते ऑनलाइन फ्रि कोंचीग क्लासेस घेत आहेत. हि विद्यार्थ्यांसाठी प्रा. राजेंद्र मढवी सरांनी अनमोल अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचा जरूर लाभ घेणे आवश्यकच आहे. अधिक माहिती करित सुगम ठाकूर 8830115592, प्रा. राजेंद्र मढवी 9967096513, प्रमोद ठाकुर 8976597894, यांच्याशी संपर्क साधावा.