Breaking News

बांधपाडामध्ये (खोपटे) आज होणार मतदान

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटे येथे घेण्यात येत आहे. एकूण प्रभागातील निवडणूक प्रक्रियेसाठी 4 स्वतंत्र मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी एम. के. म्हात्रे यांच्या अधिपत्याखाली चार मतदान केंद्राध्यक्षांसह 25 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, सरपंचपदासाठी शेकाप-काँग्रेस, शिवसेना व भाजपा अशी तिरंगी लढत होणार आहे. तर दोन अपक्ष आपले नशीब आजमावणार असून 5 उमेदवार व 11 सदस्य पदांसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. 3657 मतदान संख्या असलेल्या या बांधपाडा-खोपटे ग्रामपंचायतीमध्ये 1706 पुरुष व 1951 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी उरण तहसील कार्यालयात सोमवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्ही. आर. दामगुडे यांच्या अधिपत्याखाली दोन  पोलीस निरीक्षक चार पोलीस अधिकार्‍यांसह 36 पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply