Breaking News

कर्नाळा, चिपळे, कुंडेवहाळला आज मतदान

निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी चुरस; प्रशासन सज्ज

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी (24 मार्च) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहेत. या वेळी याठिकाणी असणार्‍या सदस्यपदाच्या उमेदवारांपैकी तीन ग्रामपंचायतींचे एकूण नऊ उमेदवार या अगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये काही सदस्यांसाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची असली तरी खरी रणधुमाळी ही सरपंचपदाच्या उमेदवारासाठी होत आहे. कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये एकूण 5 प्रभाग व 9 मतदान केंद्रे आहेत तर चिपळे ग्रामपंचायतीमध्ये 4 प्रभाग आणि 8 मतदान केंद्रे तसेच कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये 3 प्रभागांमध्ये 3 मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. चिपळे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मधून 2 सदस्य, प्रभाग 2 मधून 3 सदस्य तर प्रभाग 3 मधून 2 सदस्य असे एकूण 7 सदस्यपदासाठीचे उमेदवार तर कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मधून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये एकही सदस्य बिनविरोध नसल्यामुळे येथील निवडणूक मजेशीर ठरणार आहे. या वेळी होणार्‍या निवडणुकांमध्ये सरपंचपदासाठी कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये म. साबीर इकबाल दळवी आणि गणेश पांडुरंग पाटील यांच्यात थेट लढत होत असून कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये सदाशिव वास्कर आणि मिथुन मधुकर भोईर यांच्यात आणि चिपळे ग्रामपंचायतीसाठी कविता संदीप शीद आणि सविता राजू हिंदोळा या दोन उमेदवारांमध्ये सरपंचपदाची लढत होणार आहे. त्यामुळे रविवारी मतदारांनी दिलेल्या मताची पेटी कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात पडते हे 25 मार्च रोजी होणार्‍या मतमोजणीच्या दिवशी समोर येणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply