Breaking News

गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे पेणला उद्घाटन

पेण : प्रतिनिधी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पेण येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री रवीशेठ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते चिंचपाडा येथील ग्रामीण रुग्णालयशेजारील इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पेण नगर परिषद क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हटकर वाड्यातील श्री गणरायाच्या दर्शनाने रवीशेठ पाटील यांनी केला. यानंतर पेणच्या अंबिका माता मंदिरात जाऊन उपस्थित मान्यवरांनी जगदंबेचे दर्शन घेतले. तेथून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी चिंचपाडा कार्यालयाजवळ पोहचले. त्या ठिकाणी माजी मंत्री रवीशेठ पाटील, किशोर जैन, नरेश गावंड, गंगाधर पाटील, अविनाश म्हात्रे,  हिमांशु कोठारी, वैकुंठ पाटील, ललित पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply