पनवेल ः रामप्रहर वृत्त
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर 12 येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित झाला आहे. या योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले, तर खारघरमध्ये आपला दवाखानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या दवाखान्याच्या शुभारंभावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, माजी नगरसेवक अनिल भगत, निलेश बावीस्कर, प्रवीण पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper