Breaking News

पनवेल तालुक्यात 182 कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू; 77 जण कोरोनामुक्त

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 2) कोरोनाचे 182 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 77 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 115 नवे रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 65 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 67 नवे बाधित असून 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका व्यक्तीचा

मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 36 तृप्ति कॉम्प्लेक्स मधील एका व्यक्तीचा आणि खारघर सेक्टर 12 मधील प्राजक्ता सोसायटीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  दिवसभरातील रुग्ण संख्येत कळंबोलीत नऊ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 417  झाली आहे. कामोठे मध्ये 23 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या 594  झाली आहे. खारघर मध्ये 28 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 485  झाली आहे.  नवीन पनवेल मध्ये 16  नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 376  झाली आहे. पनवेल मध्ये 32  नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 416  झाली आहे.  तळोजा मध्ये सात नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 104   झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 2392   रुग्ण झाले असून 1487  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.91  टक्के आहे. 856  रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी 67 नवीन रुग्ण आढळले असून गव्हाण येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णांमध्ये सुकापूर नऊ, बारापाडा आठ, दिघाटी सात, उलवे सहा, करंजाडे, आदई आणि नेरे मध्ये प्रत्येकी चार, विचुंबे तीन, कोळेवाडी पाल बुद्रुक तीन, पोयंजे, गव्हाण व कोपर प्रत्येकी दोन, साई, रेवरणे, दापोली, शेलघर, आकूर्ली, विहीघर, शिवकर, वावंजे आणि कोप्रोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांमध्ये सुकापूर दोन, उलवे, आदई, पाले बुद्रुक, वहाळ, आकुर्ली, वावंजे, उसर्ली, शिरढोण, वडघर, विचुंबे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

उरणमध्ये चौघांना कोरोना; एकाचा मृत्यू

उरण : तालुक्यात गुरुवारी (दि. 2) मुळेखंडफाटा, सारडे, उरण पोलिस स्टेशन व उरण येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच तालुक्यातील उरण तीन, गोवठणे दोन, करंजा, जासई, नागाव येथील प्रत्येकी एक असे एकूण आठ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुळेखंडफाटा येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या  291  झाली आहे.

नवी मुंबईत एकूण बाधित सात हजारांवर

265 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत गुरुवारी 265 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बधितांची एकूण संख्या सात हजार 088  झाली आहे. 131 जण बरे होऊन परतल्याने  बरे झालेल्यांची एकूण संख्या तीन हजार 965 झाली आहे.

सद्य स्थितीत नवी मुंबईत दोन हजार 899 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 224 झाली आहे.  नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 24, नेरुळ 52, वाशी 21, तुर्भे 15, कोपरखैरणे 48, घणसोली 44, ऐरोली 49 व दिघा 12 असा समावेश आहे.

कर्जतमध्ये सात नवे रुग्ण

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यात गुरुवारी आणखी सात नवीन रुग्ण आढळून आले असून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 152 वर पोहोचली आहे. शहरातील मुद्रे बुद्रुक येथील नेमिनाथ अपार्टमेंट 67 व 32 वर्षीय महिला, शहरातील म्हाडा वसाहतीमधील 56 वर्षीय पुरुष, तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील गरुडपाडा गावातील 25 वर्षीय तरुण, पिंपळोली ग्रामपंचायत मधील भाकरीचापाडा गावात राहणार्‍या 32 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे. तसेच बोरवाडी येथील उत्तरकार्य चांगलेच महागात पडले असून त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. उत्तर कार्याचे यजमान असलेल्या कुटुंबातील हॉटेल चा व्यवसाय सांभाळणारा 24 वर्षीय तरुण, तर हालीवली गावाच्या हद्दीत असलेल्या एका 61 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply