Breaking News

नागावमध्ये कडकडीत बंद; जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद

रेवदंडा : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायत हद्दीत जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून,  पहिल्याच दिवशी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला.कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नागावमध्ये 2 ते 6 जुलैदरम्यान बंद आहे. शेजारील गावात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागावचे जबाबदार नागरिक म्हणून आणि स्वत:सह कुुटुंब व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी या पाच दिवसांच्या बंदसाठी सहकार्य करा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply