Breaking News

पनवेल भाजपमय ः रामशेठ ठाकूर ; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

कळंबोली ः रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांमुळे पनवेलमधील सर्व वातावरण भाजपमय झाले असून त्यांच्या विरोधात कोणी उभे राहायला तयार नाही. जसे देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र तसे पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर असे समीकरण बनले आहे. कोणतीही जबाबदारी ते सक्षमपणे पेलणारे आहेत, म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांच्याकडे सिडकोसारख्या महामंडळाची जबाबदारी दिली. यातून कामे करताना त्यांनी जनतेला जवळ केले आहे. त्याचीच पोचपावती आजच्या मेगा पक्षप्रवेशातून मिळत आहे, असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

कळंबोली काळभैरव सभागृहात रविवारी

(दि. 29) भाजपमध्ये मेगा पक्षप्रवेश झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पनवेल  महानगरपालिकेचे नगरसेवक विजय खानावकर यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खानावकर, नगरसेविका राणी कोठारी यांचे पती कमळ कोठारी, काँग्रेसचे भीमसेन माळी, राष्ट्रवादीचे भरत जले, शेखर जले, राष्ट्रवादीचे अ‍ॅड. धर्मनाथ गोंधळी यांनी भाजपप्रवेश केला. नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या प्रयत्नांनी तोंडरेतील व नगरसेवक अमर पाटील यांच्या प्रयत्नातूनही काही कार्यकर्ते भाजपत दाखल झाले आहेत.

या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील, मनोहर म्हात्रे, नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, राजेंद्र बनकर, बुधाजी ठाकूर, संदीप भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply