महाड : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांत महाडमध्ये अचानक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला महाडकरांनी सोमवारी (दि. 6) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरात दारूविक्री मात्र सुरूच आहे.
महाडमध्ये शुक्रवारी अचानक 14 कोरोना रुग्ण आढळले असून, बाधितांची एकूण संख्या 27 झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस महाड बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शासकीय कार्यालये आणि बँका वगळता येथील सर्व व्यवहार बंद आहेत. केवळ दवाखाने, मेडिकल आणि दूध विक्रीला बंदमधून सूट देण्यात आली आहे. महाडप्रमाणेच ग्रामीण भागातील बिरवाडी, विन्हेरेसारख्या बाजारपेठादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. या बंदला दारूविक्रेते आणि ऑनलाइन कुरिअर सर्व्हीसवाल्यांनी मात्र हरताळ फासला आहे.
दरम्यान, महाडमध्ये सोमवारी 13 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महाड शहर, एमआयडीसी, बिरवाडी, कांबळे तर्फे बिरवाडी येथील प्रत्येकी दोन, तर लाडवली, जिते, काचले, वरंध व नडगाव तर्फे बिरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय
बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम …