नवी मुंबई : बातमीदार – राजर्षी छत्रपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गुरुपौर्णिमाचे औचित्य साधत तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्याशी संवाद साधत ही संकल्पना आकारास आणली. कोरोना महामारीमुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे, हा विचार लक्षत घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.
या वेळी माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका रंजना सोनवणे, डॉ. गौतमी सोनवणे, डॉ. प्रीती सांगनी,केंद्र समन्वयक आनंद गोसावी, मुख्याध्यापक मारुती गवळी, मुख्याध्यापक जयप्रकाश सिंह यांचे सहकार्य लाभले.