Breaking News

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे; आमदार रविशेठ पाटील यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी

 बर्‍याच वेळी कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करूनही अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत, हे लक्षात घेऊन पेण शहरामध्ये ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तेथे जावून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन आपले आरोग्य जपावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकरने पेण शहरातील नगरपालिका नाका, लक्ष्मी नारायण मंदिर (रामवाडी), चावडी नाका गणपती मंदिर आणि  अंबिका माता मंदिर या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व लसीकरण केंद्रांवर एक हजार नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांंच्या उद्घाटन सोहळ्यात आमदार पाटील बोलत होते. या लसीकरण मोहिमेचा पेणमधील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती राजेश म्हात्रे, नगरसेवक शहेनाज मुजावर, अजय क्षीरसागर, अश्विनी शहा, भाजप शहराध्यक्ष हिमांशू कोठारी, विजय गौरी, भरत साळवी, अजित पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply