Breaking News

अजगराच्या पिलांना जीवदान

उरण : प्रतिनिधी – वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवसात चार अजगराच्या पिलांना जीवदान दिले असून, त्यांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.अजगर जातीचा साप हा शेड्युल्ड 1 मध्ये मोडत असल्याने त्याचे वन कायदे कडक करण्यात आले आहेत.

उरण परिसरात सर्पमित्र, निसर्गमित्र सतर्क असल्यामुळे या परिसरात अनेक वन्यप्राणी साप वाचविले जात आहेत. तसेच सापांबद्दल समज गैरसमज दूर करून समाजप्रबोधनाचे काम वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेचे सदस्य करीत आहेत. त्यामुळेच विविध भागात कोणाचा घरात अथवा घराबाहेर पडवी मध्ये कोणताही साप अथवा प्राणी पक्षी आढळल्यास संस्थेच्या सदस्यांना फोन करून बोलविले जाते.

असाच कलंबूसरे गावात कुलदीप नाईक यांच्या घराजवळ सर्प मित्र शिवप्रसाद भेंडे यांनी अजगराची पिले पकडले तसेच चिर्ले गावात रात्रीच्या सुमारास आढळून आलेली दोन अजगराची पिल्ले तेथील निसर्ग वन्यजीव संरक्षण, सर्पमित्र संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांनी पकडली असून, त्या अजगराच्या पिल्लांना वनरक्षकांच्या उपस्थित जंगलात सोडण्यात आले.

या वेळी वनरक्षक सुरदार धांडे, वनरक्षक के. सी. देवकर, वनरक्षक मिलिंद भोईर, वनरक्षक माया भोसले, वनरक्षक सुप्रिया कसबे, निसर्ग वन्यजीव संरक्षण सर्पमित्र संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी, महेश भोईर, विनीत मढवी, बंटी शेळके आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply