Breaking News

स्वराज्याची राजधानी अंधारातच

महिनाभरानंतरही किल्ले रायगड विजेविना

महाड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने किल्ले रायगड आणि परिसरातील विजेचे पोल कोसळल्याने गेल्या एक महिन्यापासून तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अंधारात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसह परिसरातील गावांमध्येही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणता राजाची जर ही अवस्था असेल तर रयतेचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोकणाला 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. महाड तालुक्यातील रायगड आणि दासगाव विभागाला याचा मोठा फटका बसला. विजेचे पोल आणि ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने विद्युतसेवा खंडित झाली. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरील 22 केव्हीचे पोल कोसळल्याने समाधीसह संपूर्ण गड अंधारात आहे. काम अवघड असल्याने आणि मनुष्यवस्ती नसल्याने महावितरण आणि सरकारने रायगडच्या अंधाराकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी असून, महाड भाजपने ही बाबत राज्य सरकारच्या बाब निदर्शनास आणून देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र महिना होऊनदेखील स्वराज्याची राजधानीत अंध:कार आहे. हे या ठाकरे सरकारचे अपयश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या नेत्यांना महाराजांचा विसर कसा काय पडू शकतो असा सवाल करून वीजपुरवठा सुरळीत होणार नसेल, तर निदान राजसदरेवर आणि समाधीस्थळी कंदील किंवा दिवे लावावेत, असे महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना सूचविले आहे.
परिसरातील गावेही प्रतीक्षेत
किल्ले रायगडसह परिसरातील बावळे, निजामपूर, पारवाडी ही गावेदेखील अंधारात आहेत. महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी साहित्य आणि अतिरिक्त निधी नसतानाही आणि कोरोनाचे संकट असतानाही योध्याप्रमाणे काम करीत आहेत, मात्र महाआघाडी सरकार कुचकामी ठरल्याचे चित्र आहे. ज्यांच्यामुळे देव्हार्‍यात देव शिल्लक राहिले, महाराष्ट्राची अस्मिता जिवंत राहिली असा रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा किल्ले रायगड तसेच आजुबाजूची गावे गेल्या महिनाभरापासून विजेच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला मात्र शिवरायांचा विसर पडला, ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply