नागोठणे : प्रतिनिधी
रायगड जिल्हा नाभिक समाज बांधवांची सभा सोमवारी (दि. 9) जनार्दन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वाकण येथील हॉटेल बाळाराम येथे झाली. या बैठकीत महाडचे दिनेश मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीसुध्दा निवड करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी सोपान मोहिते (रोहा), उपाध्यक्ष विनोद पवार (उरण), मोहन चव्हाण (पेण), सचिव महेंद्र माने (नागोठणे), सहसचिव संतोष पवार (अलिबाग), खजिनदार योगेश शिर्के (तळा), सहखजिनदार विवेक कदम (श्रीवर्धन ) यांचा समावेश आहे.
लवाद कमिटी अध्यक्षपदी प्रवीण खराडे यांची, विश्वस्तपदी दिलीपभाई टके, जनार्दन मोरे, सुनील यादव, अनिल यादव, नारायण पवार, बाळासाहेब टके, संतोष जाधव, अशोक खंडागळे यांची तर सल्लागारपदी शेखर घाडगे, गजानन इंदुलकर, रघुनाथ रसाळ, राजू गुजर, शामकांत नेरपगार, विजय साळुंखे, मंगेश शिर्के यांची निवड करण्यात आली. महेश मोहिते व राजेश खराडे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली. उर्वरित पदे थोड्याच दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती अध्यक्ष दिनेश मोरे यांनी दिली. या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष अनिल पवार यांच्यासह नऊ तालुक्यातील अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.