Breaking News

मोरा येथे घराला आग

जीवितहानी नाही; पतीपत्नी किरकोळ भाजले

उरण : वार्ताहर

उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाडा, फड न. 12 जवळ जगदिश हरी कोळी यांच्या घरातील गॅस  लिकेजमुळे घराला आग लागली. घरातील पती व पत्नी हे किरकोळ भाजले. संपूर्ण घरातील सामान भस्मसात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मोरा कोळीवाडा येथील घर न. 1018 या घरातील घरगुती लहान गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत घरातील जगदिश हरी कोळी (वय 62), वत्सला जगदीश कोळी (वय 60) हे किरकोळ भाजले असून त्यांना उपचारासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

एन.ए.डी. फायर ब्रिगेड करंजा, ओएनजीसी फायर ब्रिगेड व सिडको (द्रोणागिरी) फायर ब्रिगेड यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या वेळी उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी व सर्व कर्मचारी, सिडको (द्रोणागिरी)चे उपअग्निशमन अधिकारी अमित कांबळी, अग्निशमन दलाचे के. टी. घरत, व्ही. जे. गोसावी, फायरमन प्रणित विचारे, किरण भोईर, ए. एन. गुलानी, ओएनजीसी फायर ब्रिगेडचे महावीर सिंग, एन.ए.डी. फायर ब्रिगेड करंजाचे अधिकारी जे. एस. वाघमारे, मोहन पाटील, फायरमन डी. एच. खडसने, पी. पी. मंडा, सी. डी. रोकडे, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आदींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply