मोहोपाडा : प्रतिनिधी
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील बालकृष्ण राऊत यांनी सामाजिक बांधीलकी जपत पंचशीलनगर, मोहोपाडा वाडी व खोंडावाडी येथील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामानाचे
वाटप केले.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉकडाऊन परिस्थिती आहे. यात रोजंदारी करुन हातावर पोट भरणार्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. समाजसेवेची आवड असणार्या आपल्या कैलासवासी वडिलांची नेहमीची ईच्छा दुसर्यांना मदत केली तर आपल्याला समाधान मिळते. हि उक्ती लक्षात घेऊन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील बालकृष्ण राऊत याने निराधार विधवा महिला, रोजंदारीवर काम करणारे नागरिकांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप केले.
कोरोना पार्श्वभूमीवर रोजंदारीवर काम करणारे नागरिक घरातच बसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत आहे. याकरिता वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील बालकृष्ण राऊत यांनी पंचशील नगर, मोहोपाडावाडी व खोंडावाडी येथील नागरिकांना मदतीचा हात देत त्यांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप केले. या वेळी स्वप्निल राऊत याने पाचशेपेक्षा जास्त कुटूंबांना तांदूळ व डाळीचे वाटप केले. तर गोरगरिबांना पाचशे किलो धान्य त्याने दान स्वरुपात दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल राऊत यांनी घरातून बाहेर न पडता आपली काळजी घेण्याचे आवाहनही नागरिकांना केले. यावाटप प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, विभाग प्रमुख अजित सावंत, उपसरपंच राकेश खारकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मित्रमंडळी उपस्थित होते.
– तळोजा परिसरातील गरजूंना जेवणाची पॅकेट्स
पनवेल : वार्ताहर
तळोजा परिसरातील दानशूर व्यक्तिमत्व एकनाथ दत्तू म्हात्रे व अनिकेत एकनाथ म्हात्रे यांच्या पुढाकाराने तळोजा परिसरातील गरजुंना अन्नवाटप करण्यात येत आहे. हे अन्नवाटप लॉकडाऊन खुले होईपर्यंत चालूच राहणार असल्याचे म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
लॉकडाऊन होऊन 6 दिवस झाले असून तळोजा परिसरातील रोजंदारीवरील कामगार, विविध कंपन्यांमधील मजूर, तसेच गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे परिसरातील कोणीही गरीब गरजू व ज्यांचे हातावर पोट आहे व त्यांना आपल्या मुला बाळांच्या जेवणाची चिंता सतावत आहे अशा गरजू व्यक्तींसाठी तळोजा परिसरातील दानशूर व्यक्तिमत्व एकनाथ दत्तू म्हात्रे व अनिकेत एकनाथ म्हात्रे यांच्यतर्फे जेवणाचे पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहे.तसेच संपूर्ण लॉकडाऊन खुलेपर्यंत आम्ही गरिबांना जेवणाचे पॅकेट्स देणार आहोत अशा गरीब व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास आम्हाला 7666664773 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील अनिकेत म्हात्रे यांनी केले आहे.