पनवेल : वार्ताहर – कळंबोली गुरूद्वारा ट्रस्टतर्फे वसाहतीत शिख बांधव मोठ्या प्रमाणात जंतुनाशक व औषध फवारणी टँकरद्वारे करीत आहेत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कळंबोली गुरूद्वारा ट्रस्ट व शिख बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावावर अटकाव आणण्यासाठी व कळंबोली वसाहतीतून कोरोना समुळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ते वसाहतीत ठिकठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून टँकरद्वारे जंतुनाशक व औषध फवारणी उपक्रम गेल्या अनेक महिन्यांपासून राबवित आहेत.
त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. समाजपयोगी वेगवेगळे उपक्रम समाजबांधव कळंबोली वसाहतीसाठी राबवित आहेत. या सर्व उपक्रमाचे कळंबोली वसाहतीकडून कौतुक होत आहे.