Breaking News

गावांनाही कोरोनाचा विळखा; निष्काळजीपणामुळे वाढला संसर्ग

अलिबाग ः प्रतिनिधी

कोरोनाने आता रायगड जिल्ह्यातील गावागावांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत होणारी वाढ बाहेरून आलेल्यांमुळेच अधिक झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. काही रुग्ण हे केवळ निष्काळजीपणामुळे बाधित झाले आहेत. मला काय होतंय? या अतिहुशारीने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात सुक्याबरोबर ओलेही जळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशात कोरोनाचा प्रभाव जाणवू लागला आणि 22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर देशात पहिले लॉकडाऊन सुरू झाले. टाळेबंदीच्या काळात रायगडमध्ये लोक सुरुवातीला निर्धास्त होते. पहिल्या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. संचारबंदी होती. पोलिसांची उनाडगिरी करणार्‍यांवर करडी नजर होती. त्यामुळे रायगडमध्ये कोरोनाचा शिरकाव मर्यादित होता. गावकर्‍यांनीही कोरोनाचा धसका घेतला होता.

उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र उन्हाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढले. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून गावबंदी करण्यापर्यंत लोक पोहचले. मुंबई-पुण्यात राहणार्‍या आपल्या गावातील, नात्यातील लोकांना गावात घ्यायचे की नाही इथपर्यंतही मतमतांतरे निर्माण झाली. वादही झाले. विलगीकरणाचा पर्याय म्हणून गावात येणार्‍या नात्यातील माणसांना गावाबाहेर तंबू ठोकून किंवा शाळांमध्ये ठेवण्यात आले, मात्र चौथ्या टाळेबंदीमध्ये शिथिलता मिळाली आणि हळूहळू कोरोनाचे रुग्ण जिथे शून्य होते तेथे शेकड्यांनी बाधित होऊ लागले.

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत होणारी वाढ निष्काळजीपणामुळे अधिक झाली आहे. मास्क न लावणे, सुरक्षित अंतर ठेवून संवाद न साधणे, हात स्वच्छ न धुणे आणि मला काहीही होणार नाही या अतिहुशारीने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसत आहे. कोरोनापासून मुक्त असलेल्या

गावखेड्यांतही बाधित रुग्ण आढळत आहेत. हे सारे आजवर सुपात होते ते आता जात्यात जात आहेत. आजही जे बाधित नाहीत त्यांनी वेळीच सावधगिरी बाळगली नाही, नियमांचे पालन केले नाही, तर तेदेखील जात्यात जायला वेळ लागणार नाही.

नागोठण्यात एका पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ

नागोठणे ः मागील दोन-तीन दिवसांत कोरोनाचा नव्याने एकही रुग्ण वाढला नसल्याने कोरोनाची साखळी थांबली असे वाटत असतानाच शहरात रविवारी नव्याने एक पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. बाधित व्यक्ती तरुण असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply