Breaking News

भेंड झाड नामशेष होण्याच्या मार्गावर

मोहोपाडा : प्रतिनिधी – कौले जाऊन घरावर सिमेंटपत्रे व सुरूचे वासे लावायला सुरुवात झाल्यावर भेंड (भेंडी) हे अनेक वापरात येणारे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे.

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भेंड हे हिरवे गार सरळसोट व अनेक फांद्यांनी बहरून तयार असलेले झाड दिसायचे. गावचा शेतकरी आपल्या बैलगाडी साठी धुरंडी म्हणून वापर करायचा, टिकण्यासाठी मजबूत, पण वजनाने हलकी तर भारी वजन उचलण्यासाठी मजबूत आहे, भजनातील वाद्य नाल(ढोलकी) व घराला छप्परावर वासे म्हणूनच त्याचा वापर व्हायचा.

पूर्वी गावच्या घरांवर अनेक वर्षे टिकणारे वासे म्हणूनच त्याचा उल्लेख व्हायचा, तर पूर्वी उन्हाळ्यात गावच्या घरासमोर अंगणात मांडव असायचा त्याच्यासाठी भेंडचा वापर लोक करायचे. ग्रामीण भागातील शेतकरी जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी खळ्यात याचे बेडे (कम्पाउंड) तयार करायचा. हिरवेगार झाडाला पिवळी फुले आल्यावर अतिशय सुंदर हे झाड दिसायचे. देवघरातील घंटी सारखे फुल आहे. याची लागवड सोपी होती, पावसाच्या सुरुवातीला फांदी तोडून अगदी खडकाळ जमीन किंवा मुरमाडमध्ये रोवून ठेवल्यावर देखील तिचे मोठया झाडात रूपांतर व्हायचे,अनेक फांद्या सरळ यायच्या. सद्यस्थितीत हे झाड दुर्मिळ झाले आहे. याची शेताच्या बांधावर पुन्हा लागवड करावी, अशी मागणी झाल्यास योग्य होईल असे वाटते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply