Breaking News

भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी

नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहा तालुक्यात रायगड जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून गरिब व गरजूंना मेणबत्ती, मच्छर मोस्किटो, आयुर्वेदिक अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या, सॅनिटायझर फवारणी व वृक्षारोपण करण्यात आले.

रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गडबल, कोकबन येथे सॅनिटायझरची फवारणी करुन गरीब व गरजूंना मेणबत्ती व कछवा मेक्सिको देऊन आयुर्वेदिक गोळ्या वाटण्यात आल्या. तर धाटाव विभागातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. नव्या युवा पिढीने आदर्श घ्यावा, असे कार्यरत युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग व त्यांचे सहकारी यांच्या पाठिशी नेहमीच एखाद्या झाडाच्या सावली प्रमाणे ठामपणे उभे राहतात. जसा वृक्षांना वृक्षांचा सहवास हवा असतो, वृक्षांना भावना असतात, वृक्ष परस्परांना खुप जपतात, एवढेच नव्हे तर शेजारील वृक्षासोबत जीवनसत्त्वाचा मुक्त हस्ते आदान-प्रदान करतात काहीसा असाच सहवास रायगड जिल्हातील युवा पिढीला त्यांचा लाभला आहे.

या वेळी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी  रोहा तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष व धोंडखार ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन गावडे, सदस्य सुजित गावडे, रोठ ब्रु. सदस्य व भारतीय जनता रायगड सोशल मीडिया प्रमुख राजेश डाके, रायगड युवा मोर्चाचे सरचिटणीस नरेश कोकरे, तालुका सरचिटणीस दिपक भगत, धाटाव विभाग प्रमुख कृष्णा बामणे, रुपेश सुतार, भरत महाडिक, परशुराम माने, सामाजिक कार्यकर्ते विलास डाके, अमृता डाके या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply