Breaking News

‘कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखा’

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोविड 19 रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा काळाबाजार रोखण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल आयुक्तांना निवेदन दिले आहे.

नगरसेवक चिपळेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 विषाणूंमुळे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना ठशावशीर्ळींळी-100 ास आणि ढेलळश्रर्ळूीारल-400 ास यासारखी औषधी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन मधून लिहून दिली जातात. ठशावशीर्ळींळी-100 ास मात्र रुग्णाला सहज आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. आणि ढेलळश्रर्ळूीारल-400 ास हे औषध तर ठराविक लोकांकडेच उपलब्ध असते आणि ते साधारण 30000 रुपये किमतीचे औषध 45000 रूपयांपासून ते 60000 रूपये याप्रमाणे वाटेल त्या किमतीला काळ्याबाजारत विकले जाते.

उपरोक्त परिस्थिती विचारात घेऊन कोविड 19च्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मागणीनुसार पुरेसा साठा थेठ कंपन्यांकडून मागऊन पनवेल महानगर पालिका परिसरातील रूग्णालयांसाठी उपलब्ध करण्यात यावा व कोविड 19 विषाणूंमुळे संक्रमित रुग्णांच्या जीवन रक्षक औषधांचा काळाबाजार करणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशा दोन मागण्या केल्या आहेत. वरील मागण्यांना अनुसरून योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply