नगरसेवक अजय बहिरा यांची टीका
पनवेल : रामप्रहर वृत्त
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करत असून, प्रभागातील जनता त्यांच्या कामावर खूश आहे. मात्र शेकापचे झोपलेले माजी नगरसेवक सुनिल बहिरा यांनी कोणतीही महिती न घेता बिनबुडाचे आरोप करत बॅनरबाजी करत आहे. त्यांना उत्तर देत नगरसेवक अजय बहिरा यांनी, शेकापच्या माजी नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करणे बंद करावे, आगोदर माहिती घ्या आणि त्यानंतर बॅनरबाजी करा, अशा शब्दांत टीका केली.
पनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा महापालिकेत समाविष्ट झाली असली, तरीही या शाळेची दुरुस्ती करण्याचे काम, शिक्षकांचे पगार आणि इतर कामकाज हे सर्व रायगड जिल्हा परिषद करत आहे. तसेच प्रभाग 20 मधील नगरसेवकांनी गेल्या दोन महिन्यांपासून सिडकोचे अभियंता श्री. पटेल यांच्याकडे सातत्यापूर्ण पाठपुराठा केला असून, येत्या 2 दिवसांमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत. असे असले तरीही शेतकरी कामगार पक्षाचे पडीक माजी नगरसेवक सुनिल बहिरा यांनी कोणत्याही कामाची माहिती न घेता नुसती स्टंटबाजी करण्याचे काम करत आहेत.
याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते शंकर म्हात्रे यांनी सांगितले की, ज्यांना जनतेने पाडले त्या माजी नगरसेवकाने स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी बॅनर लावले आहेत त्यांना हेसुद्धा माहीत नाही की त्यांच्याच पक्षाच्या हातात असलेल्या जिल्हा परिषदेकडे ही शाळा आहे. प्रभाग 20 मधील नगरसेवक हे जनतेची कामे कोणतीही खोटी आश्वासने न देता करत आहेत. विकासाची एवढी कामे केली आहेत की सुनिल बहिरा तुला पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नाही. 2019 पासून आम्ही या शाळेच्या प्रश्नासंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मिटिंगमध्ये पाठपुरवठा केला होता. तुम्हाला इतकीच चिंता होती, तर कोरोना महामारीच्या काळात ग्रामस्थ किंवा कोणाची विचारपूस केली का? त्यामुळे नुसती हुशारी करायची; बॅनरबाजीचा काही उपयोग नाही. जाणूनबुजून पक्षाची खोटी बदनामी करून, बॅनरबाजी करून तुम्ही निवडून येणार नाही. जनता एवढी दुधखुळी राहिली नाही, अशा शब्दांत त्यांना खडेबोल सुनवले.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवकांच्या माध्यामातून जनतेच्या समस्या जातीने लक्ष घालून सोडविण्याचे काम करत आहोत. भिंगारी आणि काळुंद्रे येथील शाळा धोकादायक झाली आहे. त्यामुळे या इमारतीची पडझड झाल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे या संदर्भात महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्या वेळी ही शाळा जिल्हा परिषदेकडे असून, महापालिका खर्च करण्यास तयार आहे, मात्र जिल्हा परिषद यासंदर्भात परवानगी देत नाही. याबाबत पडीक नगरसेवकांना बाकी जी विकासकामे झाली आहेत ते दिसत नाहीत का. तक्का भागातील रस्ता, गावातील रस्ता आणि पनवेल रेल्वेस्टेशनच्या मुख्य रस्त्याची सुमारे 22 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत, मात्र विकासकामासाठी अडथळा अणण्याचे काम यांच्या माध्यमातून सुरू आहे.
-तेजस कांडपिळे, नगरसेवक
नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. जनसेवक म्हणून आम्ही जनतेची सेवा करत आहोत. प्रभागामध्ये विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत, तसेच रस्ते, गटार, ड्रेनेज लाईन या कामांसाठी टेंडर निघाले असून येत्या काळात ही कामे सुरू होणार आहेत. ही विकासकामे सुरू असतानाही शेकापचे पडीक माजी नगरसेवक या विकासकामांची माहिती न घेता खोटे आरोप करत आहेत.
-चारुशीला घरत, नगरसेवक