Breaking News

रायगडात 290 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 290 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 14) नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 (महापालिका हद्दीतील 175, ग्रामीणमधील 41), अलिबाग 23, खालापूर 15, रोहा 11, उरण नऊ, कर्जत व म्हसळा प्रत्येकी पाच, पेण तीन, महाड दोन आणि श्रीवर्धन तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत तरुण रोहा तालुक्यातील दोन व खालापूर तालुक्यातील एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 8346वर पोहोचला असून, मृतांची संख्या 222 इतकी झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात 360 रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणार्‍यांची एकूण संख्या 4956 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 3217 सक्रिय रुग्ण आहेत. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply