Breaking News

मोहोपाडा प्रीमिअर लीगवर अष्टविनायक संघाचे वर्चस्व

रसायनी : प्रतिनिधी
रसायनीची महत्त्वाची बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा येथे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रीमिअर लीगमध्ये अमर धुरव यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना अष्टविनायक मोहोपाडा व शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. यात नाणेफेकीचा कौल शिवशक्ती संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व अष्टविनायक संघाला फलंदाजीकरिता पाचारण केले. या वेळी फलंदाजीत अष्टविनायक संघाने तीन षटकांत 49 धावांचा डोंगर उभा केला. शिवशक्ती संघ अंतिम सामन्यात 23 धावांवरच गारद झाला. झालेल्या चुरशीच्या सामन्यात अष्टविनायक संघाने प्रथम, तर शिवशक्ती संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या वेळी शिवशक्ती संघ लवकरच गारद झाला. अंतिम सामन्यात खेळ करण्यास शिवशक्ती संघ अपयशी ठरला. मोहोपाडा प्रीमिअर लीगमध्ये मॅन ऑफ दी सीरिजसाठी अक्षय तेलिंगे याची निवड करण्यात आली, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन अहिर, गोलंदाज म्हणून सूर्यकांत म्हात्रे यांनी लौकिलाला साजेसा खेळ केल्याबद्दल त्यांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. दरम्यान, या प्रीमिअर लीगमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply