उरण : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप कमी झाला असून, त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमालीचे घटले झाले आहे. हे मोकळे वातावरण आणि प्रदुषणमुक्त वातावरण पक्षांसाठी पोषक ठरू लागले आहे. उरण परिसरात स्थलांतर करणारे विशेषतः फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. फ्लेमिंगोंच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांचा मुक्कामही वाढला आहे.
उरण जेएनपीटी परिसरातील पाणजे, डोंगरी, गव्हाण न्हावाखाडी, करंजा खाडी किनारा आणि परिसरातील पाणथळी जागा, जलाशये स्थलांतरीत पक्षांची आश्रयस्थाने आहेत. पाणथळ आणि जलाशयात खुबे, मासे, शेवाळ, कृमी, कीटक असे पक्षांचे आवडते खाद्य विपूल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने विविध जातींचे स्थलांतरीत पक्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. दरवर्षी पावसाळा संपताच हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच परदेशी पक्षांच्या स्थलांतराचा काळ सुरू होतो. या कालावधीत उरण परिसरातील पाणथळी, जलाशये आणि खाडी किनार्यावर परदेशी पाहुणे जलचर पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. यात हजारो किमी अंतर कापून येणार्या आकर्षक गुलाबी छटा असलेल्या फ्लेमिंगो पक्षांची संख्या सर्वाधिक असते.
फ्लेमिंगो पक्षांचे स्वैरपणे हवेत उडणारे थवे, त्यांच्या मोहक, आकर्षक अदा पाहाण्यासाठी, कॅमेर्यात टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची उरण परिसरात नेहमीच गर्दी होते. कोरोनामुळे सध्या नैसर्गिक मोकळे वातावरण आणि निरभ्र आकाश स्वैरपणे विहार करणार्या पक्षांसाठी पोषक ठरू लागले आहे. त्यामुळे उरण परिसरात स्थलांतरित पक्षी खासकरून फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. वाढत्या संख्येबरोबरच फ्लेमिंगोंचा मुक्कामही वाढला आहे. याबाबत निश्चितपणे अभ्यास केला जाईल, अशी माहिती वनविभागाचे डेप्युटी कॉन्झवेटर नीनू सोमराज यांनी दिली.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …