Breaking News

‘इनरव्हील क्लब’च्या अध्यक्षपदी ध्वनी तन्ना

पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. कोरोनाच्या वातावरणात सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य होते. म्हणून डिजिटल माध्यमातून झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीडीसी डॉ. सावित्री रघुपती तर प्रमुख पाहुण्या डिस्ट्रीक्ट एडीटर डॉ. शोभना पालेकर होत्या. या वेळी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी ध्वनी तन्ना यांची नियुक्ती करण्यात आली.

इनरव्हील प्रार्थना, गणेश वंदना आणि दीप प्रज्वलन होऊन सोहळा सुरु झाला. मावळत्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन आपल्या काळात म्हणजेच 2019-20 मध्ये केलेल्या उपक्रमांचा वृतांत पीपीटीद्वारे सादर केला. क्लब सेक्रेटरी कल्पना नागांवकर, ट्रेझरर हेतल बालड, आयएसओ डॉ. साधना गांधी, एडीटर शुभदा भगत यांनी आपापल्या कामांचा अहवाल सादर केला. नुतन अध्यक्षा ध्वनी तन्ना यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन नवीन कमिटीची ओळख करुन दिली.

त्यांनी आपले मनोगत सादर करताना नियोजित उपक्रमांची माहिती दिली. मोकळ्या जागेत भरपूर औषधी, फळा फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात लावून त्यांची जोपासना करुन इनरव्हील फॉरेस्ट हा मोठा उपक्रम, खेड्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील या बद्दल प्रयत्न करणे, गरजू स्त्रीयाना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी योग्य शिक्षण देणे यांसारखे अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट करण्याचा त्यांचा मानस आहे. क्लब एडीटर शुभदा भगत संपादीत क्लबचे बुलेटीन ‘प्रतिबिंब’चे प्रकाशन झाले. हे बुलेटीन क्लबची ओळख आणि क्लबच्या प्रगतीची माहिती देणारे क्लबचे प्रतिबिंबच आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा पीडीसी डॉ. सावित्री रघुपती यांनी आपल्या मनोगतात थोड्याच अवधीत क्लबने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्या आणि डिस्ट्रीक्ट ट्रेझरर डॉ. शोभना पालेकर यांनी सर्व पदाधिकारी आणि मेंबर्सना योग्य मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी क्लबला शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी हेतल बालड यांनी सेक्रेटरी अनाऊन्समेंट केली. व्हाइस प्रेसिडेंट वृषाली सावळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

नुतन अध्यक्षा ध्वनी तन्ना आणि सेक्रेटरी हेतल बालड यांचे आप्तेष्ट मित्र मंडळी, रोटरी प्रेसिडेंट हार्मेश तन्ना आणि इतर क्लबचे प्रेसिडेंट, रोटेरियन्स, अ‍ॅन्स, रोटरॅक्टर्स यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.

कमिटीमध्ये अध्यक्षा- ध्वनी तन्ना, सेक्रेटरी- हेतल बालड, ट्रेझरर- स्नेहल गोवेकर, आयएसओ- सोनाली परमार, माजी अध्यक्षा- डॉ. जयश्री पाटील, भावी अध्यक्षा- वृषाली सावळेकर, एडिटर- शुभदा भगत , सीसी- पल्लवी मुनोत, असिस्टंट सेक्रेटरी- शितल गायकवाड, सल्लागार समिती- शुभांगी वालेकर, डॉ. साधना गांधी, वैशाली म्हात्रे, निता बोर्हाडे, ज्योती गुंडेचा, कल्पना नांगावकर,  स्पेशल कमिटी- ममता सोलंकी आणि आभा जांभेकर आदी असणार आहेत.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply