Breaking News

वाढदिवसानिमित्त गणेशनगरमधील शिक्षकांकडून श्रमदान मोहीम

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुका पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेशनगरमधील सर्व शिक्षकांनी गुरुवारी (दि. 16) मराठा समाज भवन ते गणेशनगरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी काढून मार्ग मोकळा करून दुरुस्ती केली. पाली मढाळी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे तेथे पाणी साचल्याने येथून मार्ग काढणे अवघड होते, मात्र शिक्षकवर्गाने हे कौतुकास्पद काम केले. तसेच बाजूच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. अनेक जण आपला वाढदिवस बर्थ डे पार्टी, मौजमस्ती, फिरायला जाणे आदी बेत आखून साजरा करतात, परंतु सेवाभाव जपत श्रमदान करीत साजरा केलेला हा वाढदिवस सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे. या श्रमदान मोहिमेत कमलाकर शिंदे, अनिल राणे, सुनील भिलारे, कैलास म्हात्रे, जनार्दन भिलारे, नवनीत म्हात्रे, के. के. खानेकर, सुभाष चव्हाण, राजू बांगारे, संदेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कमलाकार तांडेल, मोतीराम पौनिकर, धर्मा तांडेल आदी शिक्षक सहभागी झाले होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply