Breaking News

श्रद्धा फाऊंडेशनकडून अपंगांना मदत

कर्जत ः बातमीदार

गतिमंद लोकांसाठी काम करणार्‍या श्रद्धा फाऊंडेशनने लॉकडाऊन काळात गरीब-गरजूंना मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार मागील काही दिवस कर्जत तालुक्यातील सर्व भागांत जाऊन आदिवासी, विधवा आणि गरजूंना धान्याच्या स्वरूपात मदत केली जात आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग आणि अपंग लोकांनादेखील मदत पोहचविली जात असून नेरळ परिसरातील 73 अपंगांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

श्रद्धा फाऊंडेशनच्या सहकार्याने एक महिना पुरेल असे धान्याचे किट नेरळ ग्रामपंचायत आणि चिंचवली ग्रामपंचायत हद्दीमधील अपंगांना देण्यात आले. नेरळ येथे श्रद्धा फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी श्रद्धा फाऊंडेशनचे धृव बडेकर, अख्तर, इझार, नितेश यांच्यासह श्रद्धा फाऊंडेशनसोबत गेली 20 वर्षे असलेले रमेश मुंढे आदी उपस्थित होते. नेरळ येथे धान्याचे किट वाटप करताना भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, भाजप प्रज्ञा प्रकोष्टचे संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्यासह भाजप दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष अनिता रोकडे, भाजप वाहतूक सेलचे गणेश शेळके, नेरळमधील कार्यकर्ते प्रकाश पेमारे आदी उपस्थित होते. चिंचवली ग्रामपंचायतीमधील दिव्यांगांना मदतीचे वाटप करताना चिंचवली ग्रुप ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया भगत, ज्योत्स्ना भगत, ऋषिकेश भगत, रोशन पाटील, भरत कांबरी, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नाईक आदी

उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply