Sunday , October 1 2023
Breaking News

उमरोलीत कार पेटून बालकाचा होरपळून मृत्यू

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील उमरोली गावात एका चार वर्षीय बालकाचा बंद कारला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय उमेश बुंधाटे असे मृत बालकाचे नाव आहे.

उमरोली येथे एमएच 02-एनए 5625 ही मारुती झेन कार गावातील रस्त्यावर तीन महिन्यांपासून उभी होती. या गाडीच्या काचा उघड्या असल्याने त्या भागातील लहान मुले गाडीत जाऊन खेळत असत. 22 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास या गाडीला अचानक आग लागली. या वेळी गाडीच्या मागच्या सीटवरील अभय बुंधाटे हा मुलगा आगीत होरपळला. त्याला आधी डिकसळ येथे असलेल्या रायगड हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र दुसर्‍या दिवशी त्याचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालयाकडून ऐरोली येथील पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे, मात्र दोन दिवस उलटले तरी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. बंद गाडीला लागलेली आग आणि होरपळून मुलाचा मृत्यू हा प्रकार संशयास वाव देणारा असल्याने कर्जत पोलीस काय पावले उचलणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply