Breaking News

शिल्पकारनगरला मिळाल्या मूलभूत सोयीसुविधा

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील रासळ शिल्पकारनगरमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे वीज-पाणी, रस्ते आदी मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळाल्या आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात चार विजेचे पोल आणि त्यावर लाइट बसविण्यात आले आहेत. तसेच येथील नळांना मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पकारनगरमधील जनतेला भेडसावणारे प्रश्न सुटले असून विविध समस्याही मार्गी लागल्या आहेत. रासळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सदस्य नरेश खाडे, सरपंच विष्णू मोरे, उपसरपंच धनंजय म्हस्के, सदस्य रिया म्हस्के, मंगेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने शिल्पकारनगरमध्ये रोडवर आणि गावात लाइट आली आहे. मुबलक पाणीपुरवठाही सुरू झाला. यापुढेही अनेक विकासकामे केली जाणार आहेत. त्यामुळे  परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply