Breaking News

महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो

पनवेल : रामप्रहर वृत्त
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शोचे आयोजन बुधवारी (दि. 8) करण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदार संघात श्रीरंग बारणेच्या वाढत्या लोक्रप्रियतेमुळे या रोड शोला तरुणांसह महिला आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येत्या 13 तारखेला मतदान असल्याने प्रचाराचा अंतीम टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. त्या अनुषंगाने खारघरमध्ये भव्य रोड शोचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते.
या रोड शोमध्ये विजयरथावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, शिवसेनचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उपस्थित होते. या रोड शो मध्ये अनेक तरुण भव्य बाईक काढून सहाभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी श्रीरंग बारणे यांचा मतदारांनी फुलांनी उधळन करत तसेच ठिकठिकाणी क्रेनच्या सहाय्याने भव्य हार त्यांगळ्यात घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हा रोड शोला खारघरपासून सुरुवात झाली असून संपुर्ण कळंबोली परीसरात काढण्यात आला. या वेळीही मतदारांनी त्याच जल्लेषात स्वागत करण्यात आले. या रोड शोची सांगता कळंबोलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणी झाली. या रोडशो दरम्याना महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रीक करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महपालिकेचे माजी स्थायी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, अभीमन्यु पाटील, निलेश बाविस्कर, शत्रृघ्न काकडे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, संजना कदम, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख परेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे राहुल चव्हाण, विवेक बोराडे, राष्ट्रवादीचे सचिन कुंभार, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रिया मुकादम,
कुंदा गोळे, विजय पाटील, गीता चौधरी, महिला मोर्चाच्या साधना पवार, किरण पाटील, संतोष शर्मा, परेश पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, अमर ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply